बुलंदशहर (उत्तरप्रदेश) १०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथे १०० हून अधिक धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. नाताळच्या दिवशी वैदिक मंत्रपठणाद्वारे त्यांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्यात आला.

यासाठी भाजपच्या आमदार मीनाक्षी सिंह आणि विश्‍व हिंदु परिषदेचे पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.