गोपालगंज (बिहार) येथे मुसलमान तरुणाने केली शिवमंदिरात लघवी !

प्रतिकात्मक छायाचित्र

गोपालगंज (बिहार) – येथील शिवमंदिरात एका मुसलमान तरुणाने लघवी केल्याने तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येने जमावाने येथे संघटित होऊन विरोध केला. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांनी मुसलमान तरुणाला अटक केली आहे. फिरोज आलम असे त्याचे नाव आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा सन्मान करणारे असल्याने ते कधीही अशा प्रकारचे विकृत कृत्य करत नाहीत; मात्र तरीही हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे, धर्मनिरपेक्षेतेचे आणि पुरोगामित्वाचे डोस पाजले जातात; मात्र धर्मांधांनी कितीही वाईट कृत्य केले, तरी त्यांना गोंजारले जाते !