नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

नगरपालिकेत १. रामचंद्र मुधाळे आणि  २. मिरासो शिंगे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी नगरपालिकेत देण्यात आले. हे निवेदन रामचंद्र मुधाळे आणि मिरासो शिंगे यांनी स्वीकारले. हेच निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनाही देण्यात आले.

या प्रसंगी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे हुपरी शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. शशिकांत मुधाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर, मनसेचे श्री. प्रशांत (गोटू) पाटील आणि श्री. प्रसाद देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिवाजी शिनगारे, ओमराज माळवदे, सचिन माळी, संभाजी काटकर, भाजपचे श्री. सुदर्शन खाडे, धर्मप्रेमी सर्वश्री अभिजित पाटील, सौरभ बेडगे, नरेंद्र कोरडे, सुरजित घोरपडे उपस्थित होते.