युनूस याने विकास गिरी याची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे ८० तुकडे केले !

क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणारे धर्मांध !

बहिणीवर प्रेम केल्याने हत्या केल्याची स्वीकृती

उजवीकडे विकास गिरी

रीवा (मध्यप्रदेश) – येथील विकास गिरी नावाच्या हिंदु व्यक्तीची त्याचा ठेकेदार सहयोगी युनूस अन्सारी याने हत्या केली. युनूस केवळ हत्या करून थांबला नाही, तर त्याने गिरी यांच्या मृतदेहाचे ८० तुकडे करून शहराच्या जवळ असलेल्या दुधमुनिया जंगलात फेकून दिले. पोलिसांनी जंगलातून विकासचे ८० तुकडे जप्त केले.

१. गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी विकास गिरी अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती; पण पुष्कळ शोध घेऊनही त्याविषयी काहीही निष्पन्न झाले नव्हते. एक दिवस जंगलातून मानवी अवशेष आणि त्याजवळ विकास गिरी याचे आधारकार्ड आढळल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

२. विकास गिरी यांचा मृतदेह आणि त्यांचे आधारकार्ड मिळाल्यानंतर विकासच्या वडिलांनी त्यांच्या मुलाची हत्या झाल्याची तक्रार पोलिसांत प्रविष्ट केली.

३. पोलिसांनी युनूस याला ९ मासांनंतर १४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी अटक केली. युनूसने त्याचा मेहुणा सरताज महंमद याच्याशी संगनमत करून ही हत्या केल्याचे अन्वेषणात उघड झाले.

४. आरोपी युनूस अन्सारी याने सांगितले, ‘मी आणि विकास दोघे मिळून वृक्षारोपणाचा ठेका घेत होतो. या अनुषंगाने विकास माझ्या घरी येत असे. तेव्हा माझ्या बहिणीसोबत विकासचे प्रेमसंबंध जुळले.

५. ३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी युनूस आणि त्याचा मेहुणा सरताज घरी परतले असता विकास त्याच्या बहिणीसोबत त्यांना दिसला. त्यांनी विकासच्या डोक्यावर काठीने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे ८० तुकडे करून जंगलात फेकून दिले.

संपादकीय भूमिका

  • मुसलमान युवकाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर त्याला ‘प्रेम’ संबोधणारे आणि लव्ह जिहादला विरोध करणार्‍यांना वेड्यात काढणार्‍यांना मुसलमानांच्या या कृत्याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • हिंदूंची अशी अमानुष हत्या करणार्‍या धर्मांधांना फाशीची शिक्षा द्या !