हिजाबला विरोध करणारा व्हिडिओ पोस्ट केल्यावरून इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

अभिनेत्री हेंगामेह गाझियानी

तेहरान (इराण) – इराणमध्ये गेल्या काही मासांपासून चाललेल्या हिजाबविरोधी आंदोलनाच्या प्रकरणी देशातील प्रसिद्ध अभिनेत्री हेंगामेह गाझियानी (वय ५२ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी सार्वजनिकरित्या हिजाब हटवून त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. व्हिडिओ पोस्ट करतांना त्यांनी म्हटले होते, ‘ही माझी शेवटची पोस्ट ठरू शकते.’ इराणमधील एका बाजारात हिजाब न घालता व्हिडीओ चित्रीत करत गाझीयानी यांनी हिजाबविरोधी आंदोलनाला समर्थन दर्शवले.

गेल्या आठवड्यात केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी इराण सरकारला ‘चाईल्ड किलर’ (लहान मुलांची हत्या करणारे) म्हटले होते. सरकारने ५० हून अधिक लहान मुलांचा खून केल्याचा आरोप त्यांनी या पोस्टमध्ये केला होता.

संपादकीय भूमिका

हिजाबविरोधी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या इराणच्या सरकारविषयी जगातील तथाकथित महिला संघटना, मानवाधिकार संघटना, आयोग, संयुक्त राष्ट्रे यांनी मौन का बाळगला आहे ? भारतात जिहादच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍यांचा असा विरोध झाला असता, तर हे सर्वजण गप्प बसले असते का ?