हिंदूंच्या भारतात त्यांच्यावर होणारी आक्रमणे आता थांबली पाहिजेत !

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स यांचे ट्वीट

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – हिंदू त्यांचाच देश भारत, तसेच कतार आणि पाकिस्तान यांसारख्या रानटी देशांमध्ये हिंसात्मक आक्रमणांना बळी पडत आहेत. हे आता थांबले पाहिजे, असे ट्वीट येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी केले आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी ‘#HindusUnderAttack’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. ट्वीटसमवेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा २० सेकंदाचा एक व्हिडिओही जोडला असून त्यात भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना ‘हिरो’ म्हणण्यात आले आहे. त्यात भारताचा नकाशा आणि राष्ट्रध्वजही दाखवण्यात आला आहे.