
पुणे – अफझलखानाचा इतिहास पहाता त्याची क्रूरता, धर्मांधता आणि कपटी वृत्ती लक्षात येते. अशी व्यक्ती कधीही आदर्श असू शकत नाही. अशा अफझलखानाचा वध करून प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर बांधण्यात आली होती. नंतर काही विशिष्ट समाजाने अफझलखानाला सुफी संत दाखवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्या ठिकाणी मोठी वास्तू उभी करण्यात आली होती. याविरुद्ध अनेक शिवभक्तांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. याविरोधात काही जण न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने ते बांधकाम अवैध असल्याचा आदेश दिला होता; परंतु तत्कालीन सरकार सक्षम नसल्याने न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही झाली नव्हती. १० नोव्हेंबरला वर्तमान सरकारने अवैध बांधकाम उद्ध्वस्त केले, त्याचे मी स्वागत करतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानासारख्या कपटी माणसाचा वध केला. त्याचे शीर जिजाऊ मासाहेबांना पाठवले. त्याचे उर्वरित धड त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पुरून कबर बांधली. ही कबर म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष आहे.
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत