मुंबई – वर्ष २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या दृष्टीने आम्ही मोठा आराखडा सिद्ध करत आहोत. या कार्यक्रमाला ब्रिटनमधील छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘ श्री. सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर इंग्रजांनी ब्रिटनमध्ये नेलेली ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्याविषयी आम्ही केंद्र सराकरला विंनती केली आहे. ‘जगदंबा’ तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयादशमीच्या पुजेची तलवार होती. ही रत्नजडीत आणि हिरेजडित तलवार इंग्रज मोहापायी घेऊन गेले. या तलवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पावन आणि पवित्र स्पर्श झाला आहे. त्यामुळे जगातील सर्व संपत्तीपेक्षा ही तलवार आमच्यासाठी अमूल्य आहे. ही तलवार भारतात आणण्यासाठी सांस्कृतिक विभागाकडून केंद्रशासनाकडे पत्रव्यवहार चालू आहे. यासाठी आम्ही श्री. सुनक यांच्याकडेही चर्चा करू.’’