‘पुणे प्रहार न्‍यूज पोर्टल’चे संपादक आणि पत्रकार प्रतीक गंगणे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्‍ट्ररत्न’ पुरस्‍कार प्रदान

पुरस्‍कार स्‍वीकारतांना श्री. प्रतीक गंगणे

पुणे – ‘पुणे प्रहार न्‍यूज पोर्टल’चे संपादक आणि पत्रकार प्रतीक गंगणे यांना पत्रकारितेतील भरीव योगदानाविषयी ‘मणीभाई मानव सेवा ट्रस्‍ट’च्‍या वतीने ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्‍ट्ररत्न’ पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्‍कृतिक भवन येथे हा सन्‍मान प्रदान करण्‍यात आला असून संस्‍थापक अध्‍यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांच्‍या हस्‍ते सन्‍मानचिन्‍ह आणि प्रमाणपत्र देऊन त्‍यांचा गौरव करण्‍यात आला. या वेळी डॉ. अशोक पाटील, जिल्‍ह्यातील अधिकारी, पोलीस, पत्रकार, समाजसेवक आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

पत्रकार प्रतीक गंगणे यांना या अगोदर सामाजिक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी आजपर्यंत अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झालेले आहेत. त्‍यामध्‍ये राज्‍यस्‍तरीय ‘सत्‍यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्‍काराचाही समावेश आहे. पत्रकारितेच्‍या माध्‍यमातून गेली अनेक वर्षे ते संपूर्ण जिल्‍ह्यात आणि राज्‍यात, तसेच राज्‍याबाहेर अनेक सामाजिक कार्यात सहभागी आहेत. या पुरस्‍कार सोहळ्‍यात महाराष्‍ट्रातून एकूण ४० जणांना पुरस्‍कार देण्‍यात आला.