पाकमध्ये २ हिंदु अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि धर्मांतर करून मुसलमानांशी लावून दिले लग्न !

नवी देहली – अल्पसंख्यांकांच्या अल्पवयीन मुलींचे अपहरण करणे, तसेच त्यांचे धर्मांतर करून त्यांचे लग्न लावणे, हे कट्टरपंथियांसाठी पाकिस्तानात फार सोपे आहे. निशा कोल्ही (वय ११ वर्षे) आणि हिना कोल्ही (वय १३ वर्षे) या दोन अल्पवयीन हिंदु मुलींचे तांडो गुलाम अली, बदीन येथून अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांचे लग्न लावण्यात आले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकमधील हिंदू नरकयातना भोगत असतांना त्याविषयी भारत सरकार, हिंदूंच्या संघटना, तसेच जगभरातील हिंदू काहीच करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !