हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा !

हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातकणंगले येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना देण्यात आले. या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. महेश कोरवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. भावेश पटेल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. धनंजय यादव आणि श्री. संतोष शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.