उत्तरप्रदेशात विनाअनुमती चालवले जातात ७ सहस्र ५०० मदरसे !

सर्वेक्षणातून मिळाली माहिती !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या मदरशांच्या सर्वेक्षणातून राज्यात ७ सहस्र ५०० मदरसे विनाअनुमती चालवण्यात येत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री धर्म पाल सिंह यांनी पत्रकारांना दिली. ‘विनाअनुमती चालवण्यात येणार्‍या मदरशांविषयी आता एक उच्चाधिकार समिती निर्णय घेणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व जिल्हाधिकारी सर्वेक्षणाचा अहवाल सादर करणार आहेत.

‘उत्तरप्रदेश मदरसा शिक्षण मंडळा’चे अध्यक्ष इफ्तिखार अहमद जावेद यांनी सांगितले की, विनाअनुमती मदरशांची योग्य संख्या अद्याप मिळणे शेष आहे. सध्या तरी असे अनुमाने ७ सहस्र ५०० मदरसे अस्तित्वात आहेत, यासह १६ सहस्र ५१३ मदरसे मान्यताप्राप्त आहेत. यांतील ५६० मदरशांतील शिक्षक आणि कर्मचारी यांना सरकारी अनुदानातून वेतन दिले जाते.

संपादकीय भूमिका

देशातील प्रत्येक राज्यात मदरशांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !