कर्नाटकमध्ये गीतेसारख्या पुस्तकाद्वारे ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !

तुमकुरू (कर्नाटक) – ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतरासाठी श्रीमद्भगवतगीतेसारखी ‘गीतये निन्ना ज्ञान अमृता’ नावाची कन्नड पुस्तके वाटली जात आहेत, अशी तक्रार बजरंग दलाने पोलिसांत केली आहे. या पुस्तकाची विक्री रोखण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. हे पुस्तक नवी देहली येथील कबीर प्रिंटिंग प्रेसकडून प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये ब्रह्मदेवाला ‘बाबा आदम’, महादेवाला ‘महंमद’ यांच्यासारखे असल्याचे सांगण्यात आले आहे. जैन पंथाकडून पूजण्यात येणारे आदिनाथ यांनी ‘बाबा आदम’च्या रूपामध्ये जन्म घेतला आहे. बाबा आदम ब्रह्माच्या ग्रहावरून आले आहेत. ते ब्रह्माचे अवतार आहेत, असे म्हटले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुमकुरू येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतरासाठी मोहीम राबवली जात आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! आता सरकारने यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !