चित्रपट कलाकारांचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा दिखाऊ आणि ढोंगीपणा नेटकर्यांनी केला उघड !
मुंबई – ‘अमेरिका किंवा इराण येथील समस्यांवर आवाज उठवल्याने प्रियांकाच्या व्यक्तिमत्त्वाची अमेरिकेत एक ‘जागरूक व्यक्तिमत्त्व’ अशी ओळख निर्माण होते; परंतु आपल्या देशातील लोकांच्या भावना दुखावतील, या हेतूने आपल्या देशातील मुसलमान महिलांवर होणार्या अन्यायाविरोधात ती कधीही बोलत नाही’, तसेच ‘प्रियांका चोप्रा भारतीय सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते, आपल्या देशात काय चालले आहे ? याचे प्रियांकाला अजिबात घेणे-देणे नाही’, अशा शब्दांत भारतातील नेटकर्यांनी भारतीय वंशाच्या विदेशात स्थायिक असलेल्या प्रियांका चोप्रा यांच्यावर टीका केली आहे.
It’s totally okay to appreciate and acknowledge Priyanka Chopra speaking up for Iranian women, but at the same time call out the hypocrisy of not speaking about similar plights happening to women suffering in India, especially Indian muslims.
— Andre Borges (@borges) October 8, 2022
काही दिवसांपूर्वी इराणमधील महिलांनी हिजाब विरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या त्यांच्या धाडसाचे प्रियांका चोप्रा यांनी स्वतःच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर कौतुक केले होते. त्यावर नेटकर्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला आहे.