हिंदु टॅक्सीचालकाची हत्या करणार्‍या तिघा मुसलमानांना अटक

अलवर (राजस्थान) – येथे हिंदु टॅक्सीचालक विशाल यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तसलीम, शाहरुख आणि आबिद यांना अटक केली. या तिघांनी १९ सप्टेंबर या दिवशी विशाल यांची हत्या करून त्यांचा मृतदेह मुंबई-देहली एक्सप्रेस मार्गावर फेकून दिला होता. ६ दिवसानंतर त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी अन्वेषण चालू केल्यावर त्यांना तसलीम याचे नाव समजल्यावर त्याला अलवरच्या फिरोजपूर येथील रवा गावातून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत त्याने हत्येचा गुन्हा स्वीकारला. तसेच त्याने यात शाहरुख आणि आबिद यांचाही समावेश असल्याचे सांगितल्यावर त्या दोघांनाही अटक करण्यात आली. ते विशाल यांच्या टॅक्सीत प्रवासी म्हणून बसले होते. ते फिरोजपूर येथे पोचल्यावर त्यांनी टॅक्सी थांबवली आणि विशाल यांना लोखंडी सळीने प्रहार करून बेशुद्ध केले. नंतर त्यांना टॅक्सीत घालून मुंबई-देहली एक्सप्रेस मार्गावर नेऊन तेथे त्यांची दगडांनी ठेचून हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. लूटमारीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य मुसलमानांचे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण !