श्रीगुरूंना अपेक्षित सीमोल्लंघन करूया ।

श्री. द.र. पटवर्धन

श्रीगुरूंना अपेक्षित सीमोल्लंघन करूया । श्रीगुरूंना अपेक्षित सीमोल्लंघन करूया ।
अन् खरा दशहरा साजरा करूया ।। धृ. ।।

श्रीगुरूंना अपेक्षित सीमोल्लंघन, समष्टी साधना म्हणूनी करूया ।
कृपा तयांची या माध्यमातून संपादन करूया ।। १ ।।

जाती-संप्रदायाच्या सीमा ओलांडूनी, हिंदुत्व जगुनी हिंदुत्व जागवूया ।
तन-मन-धन अन् प्राण अर्पूनी, विश्वात हिंदु तेजाचे दर्शन घडवूया ।। २ ।।

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री छप्पन वर्षांपूर्वीचे उत्तम उदाहरण ।
पाकिस्तानात घुसवूनी सेना, शत्रूची उडवली दाणादाण ।। ३ ।।

गुर्वाज्ञेने करूया आता, तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती ।
तेच खरे हिंदु तेजाचे दर्शन, तीच खरी राष्ट्रभक्ती अन् शक्ती ।। ४ ।।

– श्री. दत्तात्रेय पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१५.१०.२०२१)