मुसलमान शिक्षक आणि विद्यार्थिनी यांनी छळ केल्याचा हिंदु प्राचार्यांचा आरोप

प्राचार्य माला दीक्षित

आगरा – येथील ‘हॅरिस कन्या इंटर कॉलेज’च्या प्राचार्यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्राचार्य माला दीक्षित रडत असून महाविद्यालयातील मुसलमान समाजातील शिक्षक आणि विद्यार्थिनी यांनी त्यांचा छळ केल्याचा आरोप त्या करतांना दिसत आहेत. ‘मला प्राचार्यपदावरून हटवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मुसलमान समाजातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. मी परत जावे म्हणून ते मला त्रास देत आहेत’, असे माला दीक्षित यांना म्हटले आहे.

प्राचार्य माला दीक्षित यांनी आरोप केला आहे की, महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्यांच्या विरोधात भडकवले जात आहे. त्यांना घाबरवण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच आखले जात आहेत. महाविद्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने मुसलमान मुले उभी असतात.  भीतीच्या छायेत त्या प्रतिदिन महाविद्यालयात येतात आणि घरी जातात. या प्रकरणी सहशिक्षण संचालक आर्.पी. शर्मा यांनी सांगितले की, संबंधित प्राचार्यांच्या विरोधात असे काही घडले असल्यास संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे !