इराणने इराकच्या कुर्दिस्तानमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात १३ जणांचा मृत्यू

इराकमधील कुर्दिस्तानवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

बगदाद (इराक) – इराणने इराकच्या कुर्दिस्तानवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्यामुळे एका गर्भवती महिलेसह १३ जणांचा मृत्यू झाला, तर अनुमाने ५८ जण घायाळ झाले.

इराणच्या ‘इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड’ने हे आक्रमण केले आहे. कुर्दिस्तानमधील इराणविरोधी गटांना लक्ष्य करून हे आक्रमण करण्यात आले.