अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी केरळमधील दोघा मदरसा शिक्षकांना अटक

त्रिशूर (केरळ) – केरळमधील मदरशांमध्ये शिकण्यासाठी येणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दोघा मदरसा शिक्षकांना नुकतीच अटक करण्यात आली. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर शहरात नसीमुद्दीन नावाच्या मदरसा शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तो मेथला कंदमकुलम् येथील मदरशात शिकवायचा आणि तेथे येणार्‍या अल्पवयीन मुलांचा विनयभंग करायचा. त्याचप्रमाणे वायनाड येथील अब्दुल्ला मुसलयार नावाच्या मदरसा शिक्षकाला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपीखाली पोलिसांनी अटक केली आहे.


इस्लाम शिकवण्याच्या बहाण्याने केरळमधील मदरशांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. याआधी केरळमधील ‘कोझिकोड मुखदार तरबीथुल इस्लामिक सेंटर’मध्ये इस्लाम धर्म स्वीकारणार्‍या तरुणीने मदरशांविषयी धक्कादायक खुलासे केले  होते. तिने केंद्राच्या प्रमुखावर महिला आणि मुली यांना इस्लाम शिकवण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.

संपादकीय भूमिका

  • समाजविघातक कृत्यांचे आणि वासनांधतेचे अड्डे बनलेल्या अशा मदरशांवर सरकार बंदी का घालत नाही ?
  • अशांविरुद्ध काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी, साम्यवादी, प्रसारमाध्यमे आदी कुणीच का बोलत नाही ?