समाजातील वादामुळे राजस्थानच्या हिंगलाज माता मंदिरात विनाअनुमती धार्मिक कार्य करण्यास बंदी !

शांततेला बाधा येण्याची शक्यता !

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या बारमेड येथे पोलिसांनी हिंगलाज माता मंदिराच्या प्रशासनाला नोटीस बजावली आहे. यात म्हटले आहे की, विनाअनुमती मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य करण्याचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक कार्य करण्यापूर्वी प्रशासनाकडून अनुमती घेण्यात यावी.

याविषयी भाजपचे माजी खासदार तरुण विजय यांनी ट्वीट करून पोलिसांचे मंदिराला दिलेले पत्रही प्रसारित केले आहे. या पत्रामध्ये ‘मंदिरामध्ये खन्नी समाजातील आपापसांतील गटबाजीच्या वादामुळे शांततेचा भंग होऊ शकतोे. हा वाद जोपर्यंत संपुष्टात येत नाही, तोपर्यंत विनाअनुमती धार्मिक कार्यक्रम करण्यात येऊ नये.’

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरामध्ये वादामुळे तेथील धार्मिक कार्यासाठी अनुमती घेण्यास सांगणारे प्रशासन कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळाच्या वादामध्ये असा आदेश देते का ?