इटावा (उत्तरप्रदेश) येथील मौलानाला लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा  

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

इटावा (उत्तरप्रदेश) – विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार करणार्‍या, तसेच धमकावणार्‍या मौलाना जरजिस याला वाराणसी येथील जलद गती न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मौलाना या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. बलात्काराची घटना साडेसहा वर्षांपूर्वी घडली होती. त्या वेळी त्याने या महिलेचे अश्‍लील चित्रीकरणही केले होते. त्याआधारे तो तिला ‘बलात्काराविषयी कुणालाही सांगू नये’, अशी धमकी देत होता.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा द्यायला हवी, अशी कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !