‘माझ्या बाबांना (सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांना) प्रतिदिन ८ वाजता अल्पाहार देण्याची सेवा माझ्याकडे असते. २९.८.२०२२ या दिवशी मी झोपेत असतांना सकाळी ७.३५ वाजता माझ्या कानात ‘राम, राम, ऊठ !’, असा एका स्त्रीचा स्पष्ट आवाज ऐकू आला. मी डोळे उघडून पाहिले, तर खोलीत मला प्रत्यक्ष कुणीच उठवत नव्हते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘वातावरणात सूक्ष्मातील दैवी शक्ती असतात. त्यांपैकी काही दैवी शक्ती संतांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य करत असतात. आज बाबांना वेळेच्या आधी अल्पाहार हवा असेल; म्हणून एका दैवी शक्तीने मला हाक देऊन उठवले.’ त्यानंतर मी बाबांना विचारले, ‘‘आज तुम्हाला अल्पाहार लवकर हवा होता का ?’’ तेव्हा बाबा मला म्हणाले, ‘‘हो. आज माझ्या मनात सकाळी ७.३० वाजता अल्पाहार करावा, असा विचार आला होता.’’ त्यानंतर मी त्यांना अल्पाहार दिला.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२२)
|