नेपाळचे सरन्यायाधीश राणा नजरकैदेत : पदाचा अपवापर केल्याप्रकरणी महाभियोगाचा प्रस्ताव

नेपाळचे सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर राणा

काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर राणा यांना शेर बहादुर देऊबा सरकारने नजरकैदेत ठेवले आहे. नेपाळच्या ९८ खासदारांनी सरन्यायाधीश राणा यांच्या विरोधात महाभियोग सादर केला होता. राणा यांच्यावर भ्रष्टाचाराचे २१ आरोप झाले होते. त्यांना तात्काळ निलंबितही करण्यात आले होते.

सरन्यायाधीश राणा यांनी एका पत्रात म्हटले आहे की, महाभियोग प्रस्ताव संसदेत पारित झाला नाही. देशात नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार असल्यामुळे माझ्या विरोधात चालू असलेली महाभियोगाची कारवाईही आपसूकच संपुष्टात आली आहे. आता मी सरन्यायाधीश म्हणून काम करणार.’ सरन्यायाधीश राणा यांच्या दाव्यानंतर सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सरन्यायाधीश राणा यांची जोरदार पाठराखण केली आहे.