पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

जयपूर (राजस्थान) – श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी संत आणि हिंदु नेते आचार्य धर्मेंद्र यांनी १९ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आचार्य धर्मेंद्र आजारी होते. येथील एस्.एम्.एस्. रुग्णालयातील अतीदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. पंतप्रधान मोदी त्यांची सतत माहिती घेत होते. राजस्थानमधील भाजपचे अध्यक्ष आणि अन्य नेते यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूसही केली होती.
समाज और राष्ट्रसेवा में समर्पित श्रीमद् पंचखण्ड पीठाधीश्वर आचार्य धर्मेंद्र जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना धार्मिक और आध्यात्मिक जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। ईश्वर उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दे। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2022
श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील सक्रीय सहभाग
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी आंदोलनात आचार्य धर्मेंद्र सक्रीय होते. बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासहित आचार्य धर्मेंद्रही आरोपी होते. जेव्हा या प्रकरणावर निर्णय येणार होता, तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी या प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचा आरोपी आहे. शिक्षेपासून घाबरायला कशाला हवे ? जे केले, ते सर्वांच्या समोर केले.’ विश्व हिंदु परिषदेशी ते अनेक वर्षांपासून जोडले होते. हिंदूंच्या संदर्भातील समस्यांविषयी ते स्पष्ट आणि परखडपणे मत मांडत असत.
आचार्य धर्मेंद्र यांचा परिचय
आचार्य धर्मेंद्र यांचा जन्म ९ जानेवारी १९४२ या दिवशी गुजरातच्या मालवाडा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महात्मा रामचंद्र वीर महाराज होते. आचार्य धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव होता. आचार्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी ‘वज्रांग’ नावाचे एक दैनिक चालू केले होते. सध्या ते जयपूरच्या विराटनगर मठात रहात होते. तेथेच ते त्यांची साधना करत होते. काही वर्षांपूर्वी आचार्य धर्मेंद्र यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट दिली होती.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !