मांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक

सूरत (गुजरात) – येथील एका उपाहारगृहाचा मालक सरफराज महंमद याला अटक करण्यात आली आहे. त्याने मांसाहार मागणार्‍या ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याने त्याला अटक करण्यात आली. हिंदु संघटनांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या उपाहारगृहाच्या शीतकपाटातून ६० किलो मांस जप्त करण्यात आले.

संपादकीय भूमिका

सूरतमधील एका उपाहारगृहाच्या संदर्भात हे उघडकीस आले; मात्र देशात अशी कितीतरी उपाहारगृहे असतील जेथे लोकांची अशी फसवणूक केली जात असेल, याचा शोध कोण घेणार ?