चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या मामल्लापूरम्मधील वायालूरमध्ये अनाथालय चालवणारा पाद्री चार्ल्स (वय ५८ वर्षे) याला अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या मुलीच्या प्रसूतीनंतर चार्ल्स पळून गेला होता. दीड वर्षानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चार्ल्स चालवत असणार्या अनाथालयामध्येच ही मुलगी रहात होती. त्याने या मुलीला आश्वासन दिले होते की, तो तिला आणि तिच्या बाळाला समवेत ठेवेल; मात्र त्याने प्रसूतीनंतर या मुलीला राजमंगलम् येथे पाठवून दिले आणि नंतर तिच्याशी संपर्क ठेवला नाही. यानंतर तो पसारही झाला होता. मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.
पादरी ने अनाथालय की नाबालिग लड़की से किया रेप, बच्चा होने के बाद फरार हुआ: डेढ़ साल बाद तमिलनाडु पुलिस ने पकड़ा#TamilNadu #Rapehttps://t.co/hoygwAKBs2
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 16, 2022
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांच्या बातम्या प्रसारमाध्यमे दडपतात आणि हिंदूंच्या साधू-संतांवरील आरोपाच्या बातम्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देतात ! |