इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला आहे की, देशात पीठ १०० रुपये लिटरवर पोचले आहे. इम्रान खान यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सामाजिक माध्यमांवर पुष्कळ टीका केली जात आहे. सामान्यतः पिठाचे वजन किलोग्रॅममध्ये मोजले जाते; परंतु इम्रान खान यांनी ते लिटरमध्ये म्हटल्याने त्यांचे हसे होत आहे.
Atta Rs100 litre. pic.twitter.com/bV6KhhzB3z
— Naila Inayat (@nailainayat) September 15, 2022
१. महागाईवरील भाषणात खान म्हणाले की, सामान्य माणसाला सर्वाधिक त्रास होत आहे तो पिठाचा. पीठ दुप्पट महाग झाले आहे. आमच्या काळात एक किलो पीठ ५० रुपयांना होते, आज ते कराचीमध्ये १०० रुपये लिटरच्या वर गेले आहे.
२. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान खान यांनी सध्याच्या शाहबाज शरीफ सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. देशातील कर्जाचे सूत्र असो कि देशातील वाढती महागाई, खान प्रत्येक सूत्र लोकांसमोर मांडत आहेत.