एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. घरी आल्यावर मी पू. वामन यांना विचारले, ‘‘आज सत्संगात तुम्हाला काय जाणवले ?’ तेव्हा त्यांनी मला पुढील सूत्रे सांगितली.
१. मला सत्संगात थंडावा जाणवत होता. मला सत्संगात अधूनमधून गरमही वाटत होते.
२. माझा भाव जागृत झाला. माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.
३. मला नारायण (परात्पर गुरु डॉ. आठवले) शिवबाप्पाच्या रूपात दिसत होते. नारायण शिवस्वरूप आहेत. शिवबाप्पा कैलासात असतात, तसे ते (नारायण) सूक्ष्मातून शिवदशेत असतात.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (१३.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |