सातारा – तालुक्यातील पिंगळी खुर्द या गावात सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. शोभा अशोक थोरात यांचे नातेवाईक श्री. पोपट सदाशिव थोरात यांच्या घरी वर्षश्राद्ध होते. त्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रवचन सनातन संस्थेचे साधक श्री. विजय कणसे यांनी घेतले. गावातील १८० हून अधिक जिज्ञासूंनी या प्रवचनाचा लाभ घेतला.
श्री. पोपट थोरात हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून साधना करतात. जीवनातील अध्यात्माचे महत्त्व ठाऊक असल्यामुळे त्यांनी ग्रामस्थांसाठी या प्रवचनाची मागणी केली होती. या वेळी श्री. थोरात यांनी उपस्थितांना श्री दत्तगुरूंची प्रतिमा, ‘श्री गुरुदेव दत्त’ ही नामपट्टी आणि सनातन-निर्मित उदबत्तीचा पुडा असा संच भेट दिला. या वेळी काही जिज्ञासूंनी सनातनचे ‘चैतन्यवाणी’ हे ॲप डाऊनलोड करून घेतले. याप्रसंगी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यालाही जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. शोभा थोरात यांनी, तर सूत्रसंचालन श्री. अशोक थोरात यांनी केले. गावातील भजनी मंडळाच्या प्रमुखांनी आभारप्रदर्शन केले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्तानेही धर्मशास्त्र सांगणारी प्रवचने सार्वजनिक मंडळे, तसेच घरोघरी घेण्यात येतील.