२ सप्टेंबरपासून ३४ वा पुणे फेस्टिव्हल चालू !

पुणे – ३४ वा पुणे फेस्टिव्हल यंदा २ सप्टेंबरपासून चालू होणार असून याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ५ वाजता उद्घाटन समारंभ होईल, अशी माहिती फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. फेस्टिव्हल उद्योगपती राहुल बजाज यांना अर्पण करण्यात आला आहे.