भारतीय सैन्यात ‘अमित’ बनवून भरती होण्याचा प्रयत्न करणार्‍या ताहिर खान याला अटक  

अल्मोडा (उत्तराखंड) – उत्तरखंडमध्ये सध्या भारतीय सैन्यामध्ये अग्नीवीर योजनेच्या अंतर्गत सैनिकांची भरती केली जात आहे. यासाठी रानीखेतमधील कुमाऊँ रेजिमेंट सेंटरच्या मुख्यालयाच्या सोमनाथ मैदानात तरुण मोठ्या संख्येने आले आहेत. येथून पोलिसांनी अमित नाव सांगून पोचलेल्या ताहिर खान या तरुणाला अटक केली आहे.

त्याच्या ओळखपत्रावर ‘अमित’ असे नाव होते. भरती यंत्रेणेतील अधिकार्‍यांना याचा संशय आल्यावर त्यांनी त्याची कागदपत्रे तपासल्यावर ती बनावट निघाली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. पोलीस याची अधिक चौकशी करत आहेत. यामागे मोठा कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताहिर खान उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरातील सिकंदराबादच्या कोकर गावामध्ये रहाणारा आहे. त्याने शाळेचे बनावट प्रमाणपत्र, उत्तराखंडच्या नैनीताल येथील हल्दानीमध्ये रहात असल्याचे खोटे निवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि आधारकार्ड बनवले होते. भरतीच्या नोंदणीसाठी त्याने त्याचे नाव ‘अमित’ असे लिहिले होते. त्याने भरतीसाठीची १ सहस्र ६०० मीटरची धावही पूर्ण केली होती. जेव्हा कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली, तेव्हा त्याच्यावर संशय निर्माण झाला.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’साठीच मुसलमान तरुण ‘हिंदु’ असल्याची बतावणी करत होते. आता ते देशविरोधी कृत्य करण्यासाठीही या मार्गाचा वापर करत आहेत, हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. आता भरती होणार्‍या प्रत्येकाचीच कसून पडताळणी करणे आवश्यक आहे !