स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात एक व्यक्ती आणि एक पोलीस घायाळ

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये १५ ऑगस्टच्या सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी एका घंट्यात ग्रेनेडद्वारे २ आक्रमणे केली. पहिले आक्रमण बडगामच्या गोपाळपोरा चडूरा भागात झाले. त्यात करण कुमार सिंह नामक व्यक्ती घायाळ झाली. दुसरी घटना श्रीनगरची आहे. तेथे आतंकवाद्यांनी पोलीस नियंत्रण कक्षावर ग्रेनेड फेकले. त्यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ घायाळ झाला. सुरक्षा सैनिकांनी या परिसराला घेराव घातला आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरून एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. लष्कर-ए-तोयबाचे २ आतंकवादी या वाहनाचा वापर करत होते. याखेरीज १ रायफल आणि २ हातबाँबही जप्त करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

आतंकवादाचा निर्माता पाकला जोपर्यंत भारत नष्ट करत नाही, तोपर्यंत आतंकवादाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे, हे सरकारी यंत्रणांनी लक्षात घ्यावे !