इंडो-तिबेट सीमा पोलिसांची बस दरीत कोसळून ७ सैनिकांचा मृत्यू

पहलगाम (जम्मू-काश्मीर) – येथे इंडो-तिबेट सीमा पोलिसांना घेऊन जाणारी एक बस ब्रेक निकामी झाल्याने १०० फूट खोली दरीत कोसळून झालेल्या अपघातात ७ सैनिकांचा मृत्यू झाला, तर उर्वरित सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या बसमध्ये एकूण ३७ सैनिक आणि २ पोलीस होते. अमरनाथ  यात्रेचा प्रारंभबिंदू असलेल्या चंदनवाडी येथून सैनिकांना घेऊन ही बस परतत होती. त्या वेळी ही घटना घडली.