बांगलादेशात हिंदु शिक्षकावर विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांकडून आक्रमण !

ढाका – बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यात असलेल्या माणिकगंज शासकीय महाविद्यालयातील हिंदु प्राध्यापक रतन कुमार यांच्यावर सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘छात्र लीग’च्या नेत्यांनी आक्रमण केले. या वेळी घटनास्थळी उपस्थित असणार्‍या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.

संपादकीय भुमिका

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी आता भारत सरकारनेच प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा त्यांचा संहार होऊन ते औषधालाही शिल्लक रहाणार नाहीत !