बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न फसल्यावर महंमद फुरकान याच्याकडून त्याची हत्या

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथे १३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्याच्या प्रयत्नातून त्याची हत्या करणार्‍या महंमद फुरकान (वय २५ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. हा मुलगा ३ ऑगस्टपासून बेपत्ता होता. दुसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. गळा आवळून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न आले.