वाराणसी आणि बरेली येथे मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांकडून हिंसाचार

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – वाराणसी आणि बरेली या जिल्ह्यांमध्ये मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांच्या वेळी हिंसाचार झाला. यात अनेक जण घायाळ झाले. हिंसाचारामध्ये धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

१. वाराणसीमदील मिर्झामुराद भागात मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. येथील करधना बाराजात मिरवणुकीच्या वेळी मध्ये येणारे जांभळाचे झाड तोडण्यावरून वाद होऊन त्याचे पर्यवसान हिंसाचारात झाले. जांभळाच्या झाडासमोर असणार्‍या हिंदु दुकानदाराने झाड तोडण्यास विरोध केला असता त्याला मारहाण करून त्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोचले असता हिंदु संघटनाही तेथे पोचल्या. यामुळे गावात तणाव निर्माण झाला.

२. बरेली येथील घटनेत मझौआ गंगापूर भागात धर्मांधांनी हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक केली. यात महिलांचाही सहभाग होता. त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिले. जवळपास अर्धा घंटा ही दगडफेक चालू होती.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी धर्मांध हिंदूंवर आक्रमणे करतात आणि स्वतःच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर आक्रमणे करतात ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहे’, असे म्हणणारे आता कुठे आहेत ?