वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लॉरिडा येथील घरावर ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन’कडून धाड टाकण्यात आली. ट्रम्प यांच्या विरोधात अनेक न्यायालयीन खटले चालू असून राष्ट्राध्यक्ष असतांना त्यांनी ‘व्हाईट हाऊस’ची काही कागदपत्रे अयोग्य पद्धतीने हाताळल्याच्या प्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
MISSING NATIONAL RECORDS
The U.S. National Archives and Records Administration in February notified Congress that it had recovered about 15 boxes of White House documents from Trump’s Florida home, some of which contained classified materials 2/7 pic.twitter.com/ybf2MTPW98— Reuters (@Reuters) August 9, 2022
२ वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ट्रम्प यांनी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे फ्लॉरिडा येथील त्यांच्या घरी नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वर्ष २०२४ मध्ये होणार्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला ट्रम्प उभे रहाणार असल्याचे सांगितले जात आहे.