‘२९ जुलैपासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. या काळात नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करता येतील.
१. मंदिरात ग्रंथप्रदर्शने आयोजित करणे
अ. सोमवार, मंगळवार आदी वारांच्या दिवशी त्या त्या देवतांच्या मंदिरात सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावावे. या वेळी त्या देवतेची अध्यात्मशास्त्रीय माहिती देणारे फलकही लावता येतील. सोमवारी शिवाच्या मंदिरात पुष्कळ गर्दी असते. ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत ग्रंथप्रदर्शन लावण्याचे प्राधान्याने नियोजन करावे.
आ. देवतांच्या नामपट्ट्या, चित्रे, ग्रंथ, लघुग्रंथ आणि पदक (लॉकेट) यांचे वेगवेगळे आकर्षक संच बनवून ग्रंथप्रदर्शनावर त्यांची विक्री करू शकतो.
इ. ग्रंथप्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंना सनातन पंचांगाचे महत्त्व सांगून वर्ष २०२३ च्या पंचांगाची मागणी घेता येईल.
२. सार्वजनिक ठिकाणी प्रवचनांचे आयोजन
मंदिरे, शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, निवासी संकुले आदी ठिकाणी ‘श्रावण मासाचे महत्त्व’ याविषयी, तसेच देवतांची अध्यात्मशास्त्रीय माहिती देणार्या प्रवचनांचे आयोजन करता येईल. ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयीही उपस्थितांना अवगत करता येईल.
३. विविध कार्यक्रमांमधून अध्यात्मप्रसार
अ. चातुर्मासाच्या निमित्ताने विविध मंदिरात कीर्तन, प्रवचन आदींचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. अशा ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावता येईल, तसेच आयोजकांची अनुमती घेऊन ‘चातुर्मासाचे महत्त्व’ आदी विषयांवर प्रवचन घेता येईल.
आ. श्रावण मासात सुवासिनी मंगळागौरीच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यांच्यासाठी प्रवचन, तसेच ग्रंथप्रदर्शन यांचे आयोजन करता येईल.
इ. या मासात काही जण घरी पूजा करतात. या निमित्ताने धार्मिक कृतींचे शास्त्र सांगणारे ग्रंथ समाजापर्यंत पोचवता येतील.
४. घरोघरी जाऊन प्रसार
सण-उत्सव यांविषयीचे, तसेच विविध देवतांची माहिती देणारे ग्रंथ आणि लघुग्रंथ घरोघरी जाऊन वितरित करता येईल.
५. फलकप्रसिद्धी
श्रावण मासाविषयीची, तसेच देवतांच्या संदर्भातील माहिती सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लिहून फलकप्रसिद्धी करू शकतो.
साधकहो, श्रावण मासाच्या निमित्ताने कलियुगातील ज्ञानदीप असलेले सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ घरोघरी पोचवा !’
(२९.७.२०२२)
स्त्रियांच्या संदर्भातील ग्रंथसंच सवलतीच्या दरात उपलब्ध !
१. मराठी भाषेतील ग्रंथसंचांत अंतर्भूत असलेल्या ग्रंथांची नावे
अ. स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे
आ. केशरचना कशी असावी ? (भाग ३)
इ. सात्त्विक रांगोळ्या (भाग – १)
ई. सात्त्विक मेंदी (अयोग्य मेंदींच्या दुष्परिणामांसह)
उ. मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे प्रकार (कलाकृतींच्या सात्त्विकतेमागील कारणमीमांसेसह)
ऊ. केसांच्या समस्या आणि त्यावरील उपाय
ए. सात्त्विक आहाराचे महत्व
२. हिंदी ग्रंथसंचातील ग्रंथांची नावे
अ. आध्यात्मिक दृष्टिसे स्त्रीके लिए उपयुक्त वस्त्र
आ. धार्मिक उत्सव एवं व्रतों का अध्यात्मशास्त्रीय आधार
इ. भोजन-पूर्वके आचार
३. ग्रंथसंचांवर आकर्षक सवलत !
साधकांनी या ग्रंथांची मागणी जिल्ह्यातील स्थानिक वितरकांकडे करावी. जिल्हा वितरकांनी वरील ग्रंथांवर सवलत द्यावी. वितरकांकडे सदर ग्रंथ उपलब्ध नसल्यास त्यांनी मागणी पुरवठा विभागाकडे या ग्रंथांची मागणी करावी.’