सैनिकांची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांची घरे पाडली !  

इस्रायलने घेतला योगी आदित्यनाथ यांच्याकडून धडा !

प्रतीकात्मक छायाचित्र

तेलअवीव (इस्रायल) – दंगलखोरांच्या विरोधात कारवाईचा भाग म्हणून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दंगलखोरांची अवैध घरे पाडण्याचा आदेश देतात. त्यानुसार आतापर्यंत अनेकांची अवैध घरे बुलडोझरद्वारे पाडण्यात आली आहेत. मध्यप्रदेश सरकारनेही असाच आदेश दिला आहे. आता इस्रायलने याचा कित्ता गिरवण्यास चालू केल्याचे दिसून आले आहे.

इस्रायलच्या वेस्ट बँकमधील वस्तीत रहाणार्‍या २ पॅलेस्टाईन आतंकवाद्यांनी इस्रायलच्या सुरक्षारक्षकाची हत्या केली होती. यानंतर इस्रायलकडून या दोघा आतंकवाद्यांना अटक करून त्यांची करावत बानी हसन गावातील घरे पाडण्यात आली. या कारवाईच्या वेळी इस्रायलच्या सैनिकांवर पॅलेस्टाईन लोकांकडून पेट्रोल बाँब आणि जळते टायर फेकण्यात आले; मात्र तरीही इस्रायलने ही कारवाई पूर्ण करण्यात आली.