नांदेड, २५ जुलै (वार्ता.) – हिंदूंच्या हत्या आणि प्रसंगी दिल्या जाणार्या धमक्या यांच्या निषेधार्थ शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २४ जुलै या दिवशी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात सहस्रोंच्या संख्येने हिंदू सहभागी झाले होते. अत्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विश्व हिंदु परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील हिंदु समाज हा दहशतीच्या सावटाखाली आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद असे अनेक जिहाद हिंदु समाजाच्या विरुद्ध करण्यात येत आहेत. जोधपूरमध्ये झालेली कन्हैयालाल यांची हत्या आणि अमरावती येथे झालेली उमेश कोल्हे यांची हत्या ही त्यातील उदाहरणे आहेत. कर्नाटकमध्ये झालेल्या हिंदु मुलींच्या हत्या आणि देशातील रामजन्मोत्सवाच्या मिरवणुकांवर झालेले आक्रमण हे सर्व निषेधार्ह आहे. हरियाणामध्ये एका पोलीस अधिकार्याच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली. वर्ष २०४७ पर्यंत संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भारताला मुसलमान देश करण्याच्या वल्गनेतूनच अनेक हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.