पणजी, २५ जुलै (वार्ता.) – ‘न्यू अँड रिन्यूवेबल एनर्जी’ (नवीन आणि अक्षय ऊर्जा स्रोत) खात्याने गोव्यात विजेवर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देणारी योजना ३१ जुलै २०२२ पासून बंद केली आहे. खाते या योजनेच्या अंतर्गत विजेवर चालणार्या वाहनांना विविध प्रकारे सवलत देत होते. खात्याने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२१ किंवा त्यानंतर, तसेच ३१ जुलै २०२२ च्या पूर्वी खरेदी केलेली दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.