युरोपनंतर आता अमेरिकेतही उष्णतेचा प्रकोप दिसणार !

प्रतीकात्मक छायाचित्र

वाशिंग्टन – युरोपीय देशांमध्ये उष्णतेने २ सहस्रांहून अधिक लोकांचे जीव घेतले असून गर्मीने अनेक दशकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. युरोपनंतर आता अमेरिकेतही अशीच स्थिती निर्माण होत आहे. येथील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येणार्‍या आठवड्यात अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक राज्यांमधील लाखो लोकांना प्रचंड उष्णतेला सामोरे जावे लागू शकते. अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनार्‍यांवर भीषण उष्णता निर्माण झाली आहे. राज्य सरकारांनी लोकांना विजेचा वापर अल्प करण्याचे आवाहन केले आहे.

‘अमेरिकेतील काही भागांमध्ये ३८ ते ४० अंश सेल्सियस तापमान असेल’, अशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दक्षिणी आणि मध्य अमेरिकेतील मैदानी क्षेत्रांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून त्याचा सर्वाधिक फटका कोलंबिया, फिलाडेल्फिया आणि टेक्सास या राज्यांना बसला आहे.