काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ‘भारताच्या तिजोरीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा’ या केलेल्या विधानाला विरोध !
कर्णावती (गुजरात) – ‘भारताच्या तिजोरीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही हेच म्हटले होते’, असे विधान गुजरातचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी येथे आयोजित सद्भावना सभेत केले होते.
Bajrang Dal writes ‘Haj house’ on Gujarat Cong office wall, posters defaced Some Bajrang Dal workers scaled the walls of Congress office Rajiv Gandhi Bhavan here and wrote “Haj house” on it #Latest News by #BusinessStandard https://t.co/kd73cjat7G
— Market’s Cafe (@MarketsCafe) July 22, 2022
(भारतात बहुसंख्य हिंदू असतांना काँग्रेस सातत्याने अशा प्रकारची विधाने करत असूनही मुसलमान आणि अन्य अल्पसंख्यांक त्यांना मते देत नाहीत. तरीही काँग्रेस बहुसंख्य हिंदूंना दुखावून राजकीय आत्मघात करून घेत आहे, हे प्रत्येक निवडणुकीत दिसून येत आहे. अशी काँग्रेस लवकरच राजकीयदृष्ट्या समाप्त झाल्यास यात आश्चर्य ते काय ? – संपादक) त्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेसच्या कार्यालयावर ‘हज हाऊस’ असे लिहिले, तसेच येथील काँग्रेसच्या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.