मुसलमान रिक्शा चालकाने हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी केला विवाह !

  • उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उघड

  • तिच्या २ वर्षांच्या मुलाचेही केले बलपूर्वक धर्मांतर

गाजियाबद (उत्तरप्रदेश) – येथे रिक्शाचालक रहमत हसन याने हिंदु नाव धारण करून एका हिंदु महिलेशी बळजोरीने विवाह करून तिच्या २ वर्षांच्या मुलाचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेने १९ जुलै २०२२ या दिवशी  पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी आरोपी रहमत हसन उपाख्य साबलू याला अटक केली आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती तिला सोडून गेल्याने ती तिच्या २ वर्षांच्या मुलासह एकटीच रहात होती. या कालावधीत १० मासांपूर्वी मोहननगर चौकात आरोपी रहमत याच्याशी तिची भेट झाली. रहमत याने ‘माझे नाव ‘गुड्डू’ असून मी हिंदु आहे’, असे तिला खोटेच सांगितले. त्याने तिला साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे पीडित महिला त्याच्याबरोबर राहू लागली. ८ दिवसांनंतर ‘गुड्डू’ पीडितेला आणि तिच्या मुलाला पिलिभीत जिल्ह्यातील पुरनपूर या गावी घेऊन गेला. तेथे त्याच्या कुटुंबियांसह रहात असतांना तो मुसलमान असल्याचे पीडितेला समजले. तेथे त्याने पीडितेशी बलपूर्वक निकाह केला. त्यानंतर आरोपीने तिच्या २ वर्षांच्या मुलाचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केले. या धर्मांतराला तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली.

या घटनेची माहिती हिंदु युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादच्या घटनांत हिंदु महिला नित्य होरपळत असतांनाही सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा का करत नाही ?