देशातील मांसाच्या वाढत्या किमतीसाठी महिलांच्या मांड्या उत्तरदायी !

किर्गिस्तानमधील मौलवी सदयबकास डुलोव यांचे संतापजनक विधान

मौलवी सदयबकास डुलोव

बिश्केक (किर्गिस्तान) – मांसाच्या वाढत्या किमतीसाठी महिलांचे कमी कपडे उत्तरदायी आहेत. महिलांचे मांस तेव्हा स्वस्त होते, जेव्हा त्या त्यांच्या मांड्या दाखवू लागतात. मांसाच्या किमती तेव्हाच वाढतात, जेव्हा महिलांच्या मांसाची किंमत घटते, असे संतापजनक विधान येथील मौलवी सदयबकास डुलोव यांनी येथील एका जाहीर सभेत केले. त्यांच्या विधानाविषयी संताप व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे किर्गिस्तान येथील धार्मिक प्राधिकरणाने डुलोव यांनी कोणत्याही इस्लामी कायद्याचं उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे.

किर्गिस्तानमध्ये सध्या मांसाच्या किमतीत वाढ झाली आहे. येथे प्रतिकिलो मांस ६०० रुपये दराने मिळत आहे. याच्या किमतीत येत्या काळात आणखी वाढ होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?