उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उजेडात

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ ची एक घटना नुकतीच समोर आली. येथील अस्लम खान याने ‘संजय’ असे हिंदु नाव सांगून एका हिंदु मुलीवर २ वर्षे बलात्कार केला. नंतर सत्य उघड होताच, तो पीडित मुलीला सोडून पळून गेला. पीडित मुलगी मध्यप्रदेशातील जबलपूर येथीर रहिवासी आहे. तिने आरोपीवर कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे, असे वृत्त ‘न्यूज १८’ ने प्रसारित केले आहे.
आरोपी अस्लम खान फतेहपूर जिल्ह्यातील उमरा बागलपूर गावातील रहिवासी आहे. वर्ष २०२० मध्ये तो मध्यप्रदेशातील जबलपूर येथे पैसे कमावण्यासाठी गेला होता. तेथे एका कारखान्यामध्ये काम करत असतांना त्याची एका हिंदु मुलीशी ओळख झाली. अस्लम याने त्याचे नाव संजय असल्याचे तिला खोटेच सांगितले आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने २५ जुलै २०२० या दिवशी तेथील दुर्गा मंदिरात तिच्याशी लग्न केले. दोन वर्षे त्याने तिच्यावर बलात्कार केला. ३० जून २०२२ या दिवशी तो मुसलमान असल्याचे तिला समजले. नंतर तो तिला सोडून पळून गेला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिकादेशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडत असतांनाही सरकारी यंत्रणा त्याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! धर्मावरील या आघाताच्या विरोधात आता हिंदूंनीच संघटित होणे आवश्यक आहे ! |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था