नवी देहली – देशभरात १२ जुलै या दिवशी १६ सहस्र १०७ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली. ११ जुलैच्या तुलनेत ही संख्या ५ सहस्र ३९२ हून अधिक आहे. तसेच गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुळे मृतांचा आकडा १७ वरून ४५ वर पोचला आहे. सध्या देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० सहस्र ५८९ झाली आहे, तर १२ जुलै या दिवशी १५ सहस्र ७० नागरिक कोरोनामुक्त झाले झाले.
Corona in Bengal: Danger is increasing in corona without symptoms! Concerned state health department https://t.co/s8p4EwBell
— The Times Of Bengal (@thetimesfbengal) July 12, 2022
बंगालमध्ये सर्वाधिक रुग्ण !
देशभरात बंगालमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या २४ घंट्यांत येथे २ सहस्र ६५९ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. येथे १२ जुलै या दिवशी ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून प्रत्येक १०० नागरिकांमागे १८ रुग्णांना संसर्ग होत आहे.
#COVID19 #CoronavirusUpdates #India #COVID19india
India reports almost 18000 new corona cases
Corona cases increasing day by day
According to MHfW
Check
State wise Covid cases
More details: https://t.co/wGMnuZ0JkL
Read full article— NewsDotCom (@NewsDotCom6) July 3, 2022
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !
बंगालनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या २४ घंट्यांत महाराष्ट्रात कोरोनाचे २ सहस्र ४३५ रुग्ण आढळले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू !
देशात सर्वाधिक मृत्यू केरळ राज्यामध्ये झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत १७ जण कोरोनाला बळी पडले आहेत.