श्रीनगर – अमरनाथ यात्रा चालू झाल्यावर ८ जुलैला झालेल्या ढगफुटीमुळे यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता गंदेरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून यात्रेस पुन्हा आरंभ झाला आहे. याआधी ११ जुलैला पहलगाव मार्गावरून यात्रेस आरंभ करण्यात आला. ढगफुटीच्या वेळी १५ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण घायाळ झाले होते.