उदयपूर येथील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या केल्याचा निषेध

चंदगड (जिल्हा कोल्हापूर), ११ जुलै (वार्ता.) – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी चंदगड तालुका भाजप, श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे श्री. अश्विनकुमार पाटील आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. महंतेश देसाई यांनी जिहादी संघटनांवर बंदी घालावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची धमकी देणार्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनानंतर तहसीलदार विनोद रनवरे आणि पोलीस निरीक्षक संतोष घवाळे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सर्वश्री संतोष चव्हाण, तुकाराम मरगाळे, रघुनाथ चौगुले, दयानंद पाटील यांसह अन्य हिंदू सहभागी झाले होते.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !