राजस्थानमध्ये मंसूर अलीने दलित युवतीवर ६ वर्षे केला बलात्कार !

पोलिसात नोंदवलेला गुन्हा परत घेण्यासाठी पीडितेवर दबाव !

प्रतीकात्मक छायाचित्र

जयपूर – राजस्थानमधील टोंक जिल्ह्याच्या मेहंदवास क्षेत्रातील एका युवतीवर मंसूर अली नावाच्या मुसलमानाने ६ वर्षे बलात्कार केला. त्याने पीडितेचा अश्‍लील व्हिडिओही बनवून तिला ‘ब्लॅकमेल’ करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ती १५ वर्षांची अल्पवयीन असतांना अलीने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला होता.

पीडितेने सांगितले की, २ दिवसांपूर्वीच अलीने शेतात येऊन तिला मारहाण केली, तसेच तिला आणि तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. एकूणच या प्रकाराला कंटाळून तिने सर्व माहिती तिच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. भीम सेनेचे जिल्हाध्यक्ष अशौक बैरवा यांनी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे सांगून अलीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दुसरीकडे अलीचे कुटुंबीय अली याच्यावरील गुन्हा परत घेण्यासाठी पीडितेवर दबाव आणत आहेत.

संपादकीय भूमिका

  • कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले काँग्रेसशासित राजस्थान राज्य !
  • ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ म्हणून दलित बांधवांना हिंदूंपासून दूर करणार्‍यांना आता समस्त हिंदूंनीच सनदशीर मार्गाने जाब विचारायला हवा !